स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र' मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करणेत की, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करण्याकरिता महाविद्यालयाने ' युनिक अकॅडेमी' यांनी प्रकाशित केलेले ग्रंथ आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
या ग्रंथामध्ये विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांचे त्यांच्या स्वतःचे अनुभव कथन केलेले प्रेरणादायी ग्रंथ, IAS प्लॅनर, चालू घडामोडी, वार्षिके,आयोगाच्या गतवर्षीय झालेले प्रश्नसंच यासारखे सुधारीत आवृत्तीचे ग्रंथ आपणासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध करून दिलेले आहे. हे सर्व ग्रंथ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थ्यांना सर्वप्रथम प्राधान्याने देण्यात येणार आहे . तरी सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालय सुरु झालेनंतर सदर ग्रंथाचे वाचन करण्याकरिता ग्रंथ घेऊन जावेत.
डॉ. शिवदास शिरसाठ
प्राचार्य
No comments:
Post a Comment