About N-List Consortia :
भारतातील विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये सुसूत्रता आणण्याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) INFLIBNET ची स्थापना केली. INFLIBNET द्वारे National Library Information Services Infrastructure for Scholarly Content (N-List) हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. N-List कन्सोर्शीयाच्या माध्यमातून ई-संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. N-List मध्ये 1,99,000+ पेक्षा जास्त E-Books आणि 6000+ पेक्षा जास्त E-Journals उपलब्ध आहेत. ऑनलाईन नियतकालिके व ऑनलाईन डेटाबेस वाचनसाहित्य याचा कायदेशीर वापर करणे आणि सभासदत्व घेणे हे N-List कन्सोर्शीयामुळे शक्य झाले आहे. महाविद्यालय N-List चे दरवर्षी सभासद शुल्क अदा करून प्राध्यापक,विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी यांना निशुल्क सभासदत्व दिले जात आहे. तरी सर्वांनी N-List चे सभासदत्व घेण्यासाठी पुढील सूचनेचे पालन करावे.
N-List Registraion :
N-List कन्सोर्शीयाचे सभासद (Member) होण्याकरिता प्राध्यापक, विद्यार्थी यांनी खालील दिलेल्या गुगल- फॉर्म लिंकद्वारे आपली स्वतःची माहिती [ नाव,ई-मेल आयडी, मोबाईल नं, डेसिगनेशन (जसे-प्राध्यापक,विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी) ,डिपार्टमेंट इ.] भरून गुगल फॉर्म सबमिट करावे. कॉलेज अडमीन आपण सबमिट केलेली माहिती N-List कडे पाठविलेनंतर आपणास स्वतःच्या ई-मेलवर Member Activation चा मेल पाप्त होईल.
Registration Form Link : https://forms.gle/LCxDoRYPpwpuX5FB6
Get Activation E-Mail :
गुगल- फॉर्म मध्ये दिलेल्या ईमेलवर आयडी वर खालीलप्रमाणे N-List मार्फत Member Activation चा मेल मिळेल. यामध्ये आपणास User ID व Password (One Time Password) प्राप्त होईल. तसेच या मेलमध्ये OTP चा वापर करून Password Set करण्याकरिता सोबत दिलेल्या कंसातील [ You need to activate your username using the OTP and set your desired password using https://nlist.inflibnet.ac.in/vactivate.php. ] लिंक मिळेल त्यावर क्लिक करून दिलेला User ID व Password (One Time Password) च्या आधारे तुम्हाला तुमचा इच्छित पासवर्ड सेट करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही Set केलेल्या Password च्या आधारे N- List मध्ये Members Login मधून .User ID व Password वापरून प्रवेश करता येईल.
Sample of User Activation Email
N-List Member's Login :
N-List मधील ई-संसाधने पाहण्याकरिता खालील लिंकद्वारे N-List होम पेजवरील Members Login मध्ये User ID म्हणजे स्वतःचा ईमेल व Password टाकून Login करावे.यानंतर Member User Consent हे पेज ओपन होईल यामध्ये Accept वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-संसाधने उपलब्ध होतील.
Home Page of N-List
|
Home Page of N-List |
|
Member User Consent |
Access E-Resources : एकदा यशस्वीपणे Login झाल्यानंतर N-List मधील आपणास हव्या असलेल्या प्रकाशकाची ई-संसाधने ऑंनलाईन (Read) वाचता येतात,चाळता (Browse) येतात, तसेच जतन (Save) करता येतात.
E-Resources Page
Demo Video on...
Use and Awareness about N-List E-Resources
Video
(Click on it to watch the video)
सूचना :
N-List Database वापरण्याबाबत युजरना काही समस्या असल्यास त्यांनी N-List ऍडमिन यांच्याशी संपर्क साधावे.
N-LIST College Admin Details:
- Mr. Sunil Tukaram Bhosale (Librarian)
- Email : ycclibrary1972@gmail.com
- Mob.No.:9822056469
No comments:
Post a Comment